कापसाच्या भावात झाली वाढ, प्रति क्विंटल दहा हजाराने होते खरेदी

शेअर करा.

मुक्ताईनगर : खान्देश मधील कापसाच्या बाजारपेठेत मंगळवारी मराठवाड्यातील कापसाला प्रत्येकी क्विंटल १० हजार रुपये दराचा भाव मिळालेला आहे . स्थानिक कापसाला मात्र प्रतवारीच्या फेऱ्यात साडेआठ ते ९ हजार रुपयांच्या दराची चकाकी प्राप्त झाली आहे . कापूस बाजारपेठेतील ही दरवाढ एका प्रकारे ऐतिहासिक असून संक्रातीच्या पर्वावर आणखी दरवाढीचा अंदाज व्यक्त केला जात आहे .

खासगी बाजारपेठेत मंगळवारी धरणगाव या ठिकाणांच्या जीनिंगवर मराठवाड्यातील कापसाची तब्बल १० हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी झाल्याचे कळाले आहे . २०११ मध्ये सात हजार दोनशे हा उच्चांकी भावाचा कापूस खरेदीचा इतिहास होता . तर संभाव्य दर वाढल्याने बाजारपेठेत कापसाची आवक मंदावलेलीच आहे . काही शेतकरी हे अजून देखील कापूस संभाळून आहेत .

गाठाणीला ७२ हजारांचा भाव मंगळवारी कापसाच्या एका गठाणीमागे ७२ हजार इतका दर मिळालेला होता देशातील कापसाच्या निर्यात बाजारपेठेत आतापर्यंतचा हा उच्चांकी दर आहे . याआधी २०११ मध्ये ५२ हजारांच्या टप्पा गाठला होता . तर सप्टेंबर २१ मध्ये ६८ हजारांचा आकडा गाठला होते . २०२२ हे वर्ष कापसासाठी एक आनंददायी नवीन पर्व ठरलेले आहे . नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही १० हजार रु . प्रतीक्विंटलच्या आसपास भाव आहे परंतु आणखी भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकरी कापूस सांभाळून आहेत .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply