कापसाला पुढे पण मिळणार असाच भाव.

शेअर करा.

जळगाव : यावर्षी कापसाला विक्रमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे, त्यात आता कापसाच्या भावामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने खासगी बाजारात कापसाची आवक मंदावली आहे .

 

३१ जानेवारी रोजी दिल्लीमधिल केंद्र सरकारसोबत कापूस मार्केटमधील व्यापाऱ्यांची बैठक होणार असून , या बैठकीमध्ये कापसाच्या गाठीवरील आयात शुल्काब्द्दलचा निर्णय घेतला जाणार आहे .

 

शासनाने आयात शुल्क हा कायम ठेवल्यास कापसाच्या दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी राज्यासह संपूर्ण देशामध्ये अति पावसामुळे कापसाच्या उत्पादनात ४० ५० लाख गाठींची घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

 

त्यात देशभरात कापसाला मोठी मागणी आहे त्यामुळे कापसाच्या दरात विक्रमी वाढ झाली असून ही वाढ अजून दुप्पट शक्यता आहे . सध्या कापसाचा भाव ९ , ५०० ते ९ , ६०० रुपये प्रतिक्विंटल आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply