कामावर परतण्याकरिता फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक, त्याशिवाय इंट्री नाही.

शेअर करा.

जळगाव : विलीनीकरणाच्या मागणीकरिता संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर महामंडळातर्फे थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येत असल्यामुळे काही कर्मचारी हे कामावर रुजू होण्याची संपूर्ण तयारी दाखवत आहेत . संपूर्ण जिल्ह्यामध्ये असे १५० ते २०० कर्मचारी कामावर रुजू होण्याकरिता इच्छुक आहेत . परंतु , संप सुरू होऊन जवळजवळ दोन महिने होत असल्यामुळे महामंडळ प्रशासनाने कामावर रुजू होण्याकरीता येणाऱ्या कर्मचाऱ्यांना फिटनेस प्रमाणपत्र म्हणजे वैद्यकीय दाखला आणणे सक्तीचे केले आहे . तरच या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येणार आहे .

 

राज्य एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपावरशासनाकडून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही . विलीनीकरणाचा प्रश्न न्यायालयात गेल्यामुळे यावर आता ५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे . परंतु , न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत महामंडळाने वेतनवाढ देऊन संपातील कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे वेळोवेळी आवाहन केलेले .

मात्र , तरीदेखील बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी हे कामावर रुजू झाल्यामुळे महामंडळाने थेट बडतर्फीची कारवाईस सुरूवात केली आहे . कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विरोध करणे व कामबंद आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न करणे हा ठपका ठेवून बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे . महामंडळाच्या या कडक कारवाईनंतर देखील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीवर ठाम राहून आंदोलन सुरूच ठेवलेले आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply