कार्तिक ने दिली धमकी, अल्लू अर्जुन चा रिमेक थांबला.

शेअर करा.

Khandeshtimes News : करण जोहरने ‘ दोस्ताना 2 ‘ या चित्रपटातून कार्तिक आर्यनची हकालपट्टी केली असल्याने , त्यावर बराच खल झाला होता . कार्तिकचे चाहते यामुळे मोठ्या प्रमाणात भडकले होते करणने कार्तिकवर ‘ अनप्रोफेशनलिज्म’चा आरोप केला जात होता .

आता परत एकदा एका निर्मात्याने कार्तिकवर हाच आरोप केलेला दिसून येत आहे . होय , चित्रपट निर्माता मनीष शाह यांनी कार्तिकवर ‘ अनप्रोफेशनलिज्म’चा आरोप केला आहे . कार्तिक आर्यनने दिलेल्या धमकीमुळे साऊथ आयकॉनिक स्टार अल्लू अर्जुनच्या ‘ अला वैकुंठपुरमलो ‘ या तेलगू सिनेमाचं हिंदी व्हर्जन थेटर मध्ये रिलीज होऊ शकलं नाही . यामुळे आपल्याला त्यातून २० कोटींचा तोटा सहन करावा लागला , असा दावा त्यांनी केलेला आहे .

‘ शहजादा’च्या मेकर्समुळे व कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे हा बेत रद्द करण्यात आल्याचे मनीष शाह यांनी म्हटले आहे . ‘ अला वैकुंठपुरमलो ‘ चा हिंदी रिमेक प्रदर्शित झाला तर त्याचा थेट परिणाम ‘ शहजादा’वर रेखाटून आले असते . त्यामुळे ‘ शहजादा’च्या मेकर्सनी याला विरोध केला व या विरोधामुळे अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी डब व्हर्जन सिनेमागृहांत रिलीज करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला होता .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply