• Tue. Aug 16th, 2022

  कार्यवाही टाळण्याकरिता होते आहे डील, आर्यन ची कार्यवाही करु देणार नाही का असा प्रश्न?

  ByKhandeshTimes

  Oct 26, 2021

  मुंबई : कार्डेलिया क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीप्रकरणा बाबद अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यावरील कारवाई टाळण्याकरीता प्रयत्न झाला असल्याचे कळाले होते . त्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी केली गेली असून १८ कोटींवर तडजोड करण्यात आली . यामधील ८ कोटी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिले जाणार असल्याचे कळाले आहे , या प्रकारचा दावा या कारवाईत पंच साक्षीदार असणारे प्रभाकर साइल याने केलेले आहे . त्यामुळे नव्या वादाला फाटे फुटले आहे . नोटरी केले असलेले प्रतिज्ञापत्र सादर करून त्याने हे आरोप केल्याचे कळाले आहे .

   

  यादरम्यान ,NCB ने साइलचे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत . याप्रकरणी ते न्यायालयामध्ये बाजू मांडणार आहेत . साइल हा NCBच्या केसमधला ९ पंचांपैकी एक पंच आहे .चालू काळात तो विविध गुन्ह्यांदेखत फरार असलेल्या किरण गोसावी याचा अंगरक्षक म्हणून तो कार्य करीत होता . हा संपूर्ण व्यवहार गोसावी , सॅम आणि शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी यांच्यात ३ ऑक्टोबरला सकाळी झाले होता . त्यामधील ५० लाख रुपयांची रोकड ही मी गोसावीकडे आणून दिली होती . यानंतर पूजाने फोन न उचलल्याने हा व्यवहार कम्प्लीट होऊ शकला नाही ,हा दावा त्याने केलेला आहे . थेट तुरुंग डांबने नको , पुनर्वसन मिळायला हवे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.