काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कन्नड घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली ! घाटामधून प्रवास करू नये असे केले आवाहन.

जळगाव : चाळीसगावसह परिसरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कन्नड घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली आहे . त्यामूळे या घाटामधून कोणीही प्रवास करू नये , असे आवाहन महामार्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे .

 * डोंगर भागातील तितुर व डोंगरी नदीला आला आहे मोठा पूर ! 

काल रात्री चाळीसगाव परिसरासह इतर अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे डोंगर भागातील तितुर व डोंगरी नदीला मोठा पूर आला आहे .

* काही दिवसांपूर्वी घाटामध्ये दरड कोसळून खचला होता रस्ता !

काही दिवसांपूर्वी असेच मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कन्नड घाटामध्ये दरड कोसळून रस्ता खचला होता . त्यामुळे काही दिवसांसाठी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता . प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून व पाहणी करून छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला केला होता .

* पोलिसांनी घाटामधून प्रवाशांनी प्रवास करू नये असे केले आवाहन .

पण काल पुन्हा कन्नड घाटामध्ये दरड कोसळली असून अधूनमधून दरड कोसळत आहेत या कारणामुळे पोलिसांनी घाटामधून प्रवाशांनी प्रवास करू नये असे , आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.