किनगावात २६ वर्षीय तरुणाची घरात गळफास घेऊन आत्महत्या

तालुक्यातील किनगाव येथे २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली . किनगाव येथील सचिन रामकृष्ण धनगर यांच्या खबरीनुसार , गावातील दगडू यादव धनगर ( वय २६ ) याने वेडाच्या भरात आत्महत्या केली . तत्पूर्वी , मंगळवारी रात्री तो नेहमीप्रमाणे घरात झोपला होता . सकाळी तो अंथरूणावर दिसला नाही . घराच्या मागील खोलीत त्याचा शोध घेतल्यावर त्याने सुतळी पट्ट्याने गळफास घेतल्याचे दिसले . याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली , नंतर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला . त्याने वेडाच्या भरात गळफास घेतला असावा , असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.