किनगाव , ता.यावल : काही अल्पवयीन मुलांची मदत घेउन चोरट्यांनी बॅग खुर्चीवरून उचलुन लांबविल्याची घटना बुधवारी भरदिवसा यावल तालुक्यातील किनगाव येथे घडली . यात काही अल्पवयीन मुलांची मदत घेण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये साफ दिसून आले आहे . किनगाव येथिल आंबेडकर पुतळ्या समोरभरचौकात नरेंद्र आबाजी पाटील यांचे साई ट्रेडिंग नावाचे दुकान आहे .
व्यापारी नरेंद्र आबाजी पाटील हे आपल्या दुकानात सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या दरम्यान शेतकरीयाचा माल मोजत होते.शेतकन्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी त्यांच्या वडीलांजवळ बॅगेत चाळीस हजार रूपये ठेवले होते.त्यांचे वडील ती बॅग घेवुन दुकानाच्या बाहेर खुर्चीवर बसले होते.जवळच पैशाची बॅग त्यांच्या मांडीवरच होती.आबाजी पाटील बसलेले खुर्चीवरून फक्त दोन मिनिटं बॅग खुर्चीवर ठेवुन बाजुला झालेत.तेवढ्यात वेळेतच दबा धरून बसलेले अल्पवयीन चोरट्यांनी डाव साधुन बॅग खुर्चीवरून उचलुन पोबारा केला . चोरटे दुकानाच्या शेजारी लावलेले तसेच मेन रस्त्यावर दुकानात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले असून चोरटे मात्र पसार होण्यात यशस्वी झाले . ही घटना नरेंद्र पाटील व त्यांचे वडील आबाजी पाटील यांच्या लक्षात येताच दोंघानी व ग्रामस्थांनी संपुर्ण गाव व परीसर शोधून काढला . पंरतु अल्पवयीन चोरटे कुठेही आढळुन आले नाही . या ठिकाणी पोलिसांना माहिती कळविल्यावर तब्बल पाच तासांनी पोलीस घटनास्थळी आले आणि घटनेचा पंचनामा केला.