किराणा दुकानाच्या मालकाकडे आढळल्या दोन तलवारी काय आहे त्यामागील सत्य जाणून घ्या संपूर्ण बातमी.

शेअर करा.

धुळे : देवपुरातील नकाणे रोड क्षेत्रामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरामध्ये बुधवारी छापा टाकला . घरातून दोन तलवारी जप्त करण्यात आलेल्या असून , संशयित तरुणाविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदणी करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना नकाणे रोडवरील गोकर्ण या सोसायटीत एका किराणा दुकान चालवीत असणाऱ्या व्यक्तीकडे अवैधपणे तलवारी ठेवल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती . माहिती मिळताच पथकाला तपासणी करण्याकरिता तात्काळ पाठविण्यात आले .

बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शैलेश अशोक पाटील यांच्या घरी अचानक रित्या छापा टाकला . त्याच्याकडे पथकाने विचारपूस केली असता प्रथमतः त्या ने उलट-सुलट उत्तरे दिली . त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने घरात ठेवलेल्या दोन तलवारी पोलिसांना काढून दिल्या . याप्रकरणी शैलेश अशोक पाटील ( २५ , रा . गोकर्ण सोसायटी , नकाणे रोड , देवपूर , धुळे ) याच्या विरोधामध्ये पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे . पुढील तपास पश्चिम देवपूर येथील पोलीस करीत आहेत . त्याला न्यायालयात हजर केले जाणार होते .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply