कोट्यवधींची उलाढाल राज्यात झाली बंद ; सोन्याला गुणवत्तेचा कस.

शेअर करा.

जळगाव सोन्याच्या गुणवत्तेची ग्यारंटी देण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी चालू केलेल्या हॉलमार्किंग सक्तीच्या विरोधामध्ये सोमवारी राज्यात सराफांनी विल्कशन बंद पाळला . सोन्याच्या व्यापाऱ्यांसाठी एका देशात दोन वेगवेगळी नियमावली प्रस्थापित करणे , यंत्रसामग्री नसूणआणि सोने व्यापाऱ्यांना गुन्हा केल्याप्रमाणे दंडाची तरतूदी करणे या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात हा संपूर्ण देशात बंद पुकारण्यात आला होता . याचसोबत , इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स हा दागिने विक्रेत्यांचा संघ संपात सहभागी झाली नसून . जून २०२१ पासून केंद्र सरकारने देशातील ७४१ पैकी २५६ जिल्ह्यात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क सक्तीचा केला आहे . महाराष्ट्रातील गोंदिया , चंद्रपूर , बुलडाणा , हिंगोली , परभणी आदी १४ जिल्ह्यांना हॉलमार्कच्या सक्तीतून दूर ठेवण्यात आले आहे . या धोरणाला सोने व्यापारी संघटनेचा विरोध आहे . देशातील एक तृतियांश व्यापाऱ्यांना वेगळी नियमावली आणि इतरांना मात्र सुट हा न्याय न असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे . हॉलमार्कसाठी उपयुक्त यंत्रसामुग्री देशात उपलब्ध नाही . तसेच ,राज्यात सोन्याची कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली दिसुन आली .

 

जळगाव जिल्ह्यात ७ कोटींची उलाढाली बंद :

 

हॉलमार्किंगच्या विरोधात राज्य सराफा संघटनेचे केलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील सराफांनी १०० टक्के सहभागी . शहरामधील दीडशे व जिल्ह्यातील सुमारे २ हजार सराफी पेढ्या बंद होत्या .दिवसभरातून शहरातील तीन ते साडेतीन व जिल्ह्यात सुमारे ७ कोटी रुपयांची उलाढाल सोमवारच्या बंदमुळे बंद झाल्याचा दावा हा जिल्हा सराफ असोशीयन कमिटी अध्यक्ष गौतम लुणिया यांनी केला आहे .

 

हॉलमार्किंग चे आहेत फायदे पण , ह्यूड व्यावहारीक नाहीः

 

हॉलमार्किंग हि ग्राहक आणि व्यापारी या दोघांसाठी चांगले ; परंतु त्याला जोडूण आलेले हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन नंबर ( ह्यूड ) ही ट्रॅकिंग करण्यात उपयुक्त सिस्टिम ग्राहक व व्यापारी या दोघांसाठी त्रासदेयक ठरते . त्यामुळे दोघांचा वेळाची विल्हेवाट होईल . ह्यूडसाठी लागणारा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना पडेल . प्रत्येक दागिन्यावर विशिष्ट क्रमांक असेल . तो क्रमांक कुठूनही ट्रॅक होऊ शकेल . यामुळे त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे . हा क्रमांक मिळवण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागेल . दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी वापरण्यात येणारी सँपल कट या पद्धतीने दागिना डॅमेज होऊ शकतात .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply