• Tue. Aug 16th, 2022

  कोट्यावधी सापडले कामगार अधिकाऱ्याच्या घरात ,आला कुठून इतका पैसा जाणून घ्या त्यामागील सत्य.

  ByKhandeshTimes

  Dec 12, 2021 ,

  पाटणा : दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी हाजीपूरचे जिल्हा कामगार अधिकारी दीपक कुमार शर्मा यांच्या घरी टाकलेल्या छापासत्रात कोट्यवधींची रोकड आणि मोल्यवान दागिने जप्त केले आहेत . या अधिकाऱ्याने अवैध मार्गाने कोट्यवधींची संपत्ती कमविले असल्याची माहिती दक्षता विभागाला मिळाली होती .

  त्यानुसार पाटणा हाजीपूर आणि मोतीहारी या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली आहे . पाटणातील दीघा परिसरात असलेल्या महावीर कॉलनीतील दीपक कुमार यांच्या घरातून नोटांनी भरलेल्या बॅगा आणि पोती जप्त करण्यात आली आहेत . त्याच्या घरांतून जप्त केलेली रोकड दोन कोटींहून अधिक असेल , असा अंदाज आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.