कोरोनाच्या उपाययोजना करतांना गरीबाच्या पोटावर पाय येता कामा नये-नरेंद्र मोदी

शेअर करा.

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्याकरीता उपाययोजना करत असताना लोकांच्या पोटावर पाय येणार नाही , याची दक्षता घ्यावी , असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना संकेत दिले आहे . ओमायक्रॉन विषाणूमुळे रुग्णांची संख्या अधिक वेगाने वाढत आहे . ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला असेल तिथे स्थानिक स्तरावर कन्टेन्मेंट करण्यात यावी यादेखील सूचना त्यांनी केली .

देशातीमधिल कोरोना स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सहाय्याने गुरुवारी चर्चा केली त्यात मोदी म्हणाले की , कोरोना साथीला रोखण्यासाठी लसीकरण हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे . मागच्या दहा दिवसांत १५ ते १८ वर्षे वयोगटातील तीन कोटी मुलांचे लसीकरण करण्यात आले होते . कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी भारत सक्षम आहे व तशी पूर्वतयारीही देशाने केली आहे , हे या घटनेतून सिद्ध झाल्याचे दिसून आले आहे . मोदी म्हणाले , भारतात बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसी प्रभावी असल्याचे आता जगभरात सिद्ध झाले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply