कोरोनाच्या सुट्टीमुळे रोजगारांना आली वाढ.

शेअर करा.

नवी दिल्ली : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे रोजगारावरती मोठे संकट आले होते .परंतु सध्याच्या काही महिन्यांपासून सध्यास्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे . कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ( ईपीएफओ ) जुलैमध्ये १४.६५ लाख इतके नवीन सदस्य त्यांच्याशी जुळवून घेतले आहे . जून महिन्याच्या तुलनेत त्यात ३१.२८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे .

 

ईपीएफओने सादर केलेल्या आकडेवारी प्रमाणे सुमारे चार महिन्यांपासून सदस्यांच्या संख्येत वाढ होत आहे . यावरून देशातील औपचारिक रोजगार व नोकरदार या वर्गासाठी संधी वाढत असल्याचे समोर आले आहे .कोविड-१९ च्या द्वितीय लाटेमुळे एप्रिलपासून खूप सार्‍या राज्यांनी सक्तिन्रिर्बध लागू केले होते . एप्रिलमध्ये ८.९ लाख व मे महिन्यात ६.८७ लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली होती . जुलैमध्ये नऊ लाख सदस्य पहिल्यांदाच ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आलेले आहेत , तर ५.६३ लाख इतके सदस्य ईपीएफओमधून बाहेर पडून परत समाविष्ट झालेले आहेत . म्हणजेच , त्यांना पुन्हा नोकरी प्राप्त झाली आहे . हे प्रमाण नऊ टक्क्यांनी वाढले दिसून येत आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply