कोरोनाच्या ‘Omicron’ वेरिएंटमुळे सोन्याच्या दरात झाले हे बदल,जाणून घ्या सविस्तर माहिती.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘Omicron  ‘ हा वेरिएंटने संपूर्ण जगाकरिता चिंता निर्माण केली आहे . यामुळे सोने आणि चांदीच्या दरांवर देखील मोठा प्रभाव दिसून येतोय .मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ होत आहे . आज मंगळवारी पुन्हा सोने व चांदीचे भाव वाढले आहे .

 

आजच्या तारखेला सोन्याचे दर प्रतितोळा 47780 रुपयांवर पोहोचले आहेत . सोमवारी सोन्याचे दर 46,770 वर बंद झालेले होते . म्हणजे आज सोन्याच्या दरामध्ये सरासरी हजार रुपयांची वाढ झालेली आहे . तर दुसरीकडे चांदीच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली असून , चांदीचे दर हे प्रति तोळा 61 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत .

 

प्रमुख शहरातील दर कमोडिटी मार्केट प्रमाणे आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46780 रुपये आहेत . तर 24 कॅरेट सोन्याचे दर 47770 इतक्या रुपयांवर पोहोचले आहेत . नागपूरमध्ये प्रति तोळा 22 कॅरट सोन्याचे दर 46780 रुपये आहेत तर 24 कॅरेट सोन्याचे दर 47780 रुपये इतके आहेत . पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46220 तर 24 कॅरेट सोन्याचे दर जवळपास 49550 रुपयांवर पोहोचले आहेत . आज पुण्यामध्ये सोन्याला महागाई पडल्याचे दिसून आले आहे .

 

मागील वर्षभरापासून सोन्याचे दर सातत्याने स्थिर नसल्याचे दिसून येत आहे . गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च जागेवर म्हणजे प्रति तोळा 56 हजार इतके पोहोचले होते . परंतु त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत गेली . या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात तर सोन्याचे दर 45 हजारां वरून खाली आले होते . परंतु त्यानंतर पुढील दोन महिन्यांत ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये त्यात सरासरी अडीच ते तीन हजारांची वाढ होऊन ते 47 हजारांपर्यंत पोहोचले आहे . सोन्याचे भाव सातत्याने कमी जास्त होत असल्याने गुंतवणूकदार जोखमी घेण्याच्या तयारीत नसल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे . गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्यापेक्षा इतर मार्गाचा शोध घेत असल्याचे समजले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.