कोरोना पार्श्वभूमीवर रेल्वेचा मोठा निर्णय वाचा संपूर्ण बातमी.

मुंबई – covid-19 चा संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे रेल्वे – प्रशासनाने कोरोना आधीच्या नियमित चालविल्या जाणाऱ्या १७०० ट्रेन नियमितपणे चालवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. याच बरोबर कोरोना काळामधील विशेष रेल्वे , विशेष भाडे दर हे बंद होणार असल्यामुळे रेल्वेचे तिकीट दर पूर्वीप्रमाणेच आकारण्यात येतील हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

 

संपूर्ण देशातील कोव्हीड संसर्गाचा ताप हा कमी झाल्याने तसेच कोरोना रुग्णांच्या संख्यामध्ये घट झाल्याकारणाने सरकारने संपूर्ण देशभरात सामान्य रेल्वे सेवा संपूर्ण क्षमतेने सुरू करण्याची घोषणा केली आहे .रेल्वे मंत्रालयाने भाडे दरा संबंधात स्पष्ट केले आहे की , पूर्वी प्रमाणेच तिकिटांचे दर राहणार असून कोणतेही विशेष दर आकरण्यात येणारं नसल्याचं सांगितले गेले आहे . त्याच बरोबर आता विशेष गाड्या देखील बंद होऊन नियमित रेल्वे गाड्या सुरु केला जाणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.