कोरोना मृत पावलेल्या महिलेला दिली कोरोनाची लस

शेअर करा.

उंडणगाव ( जि . औरंगाबाद ) : करोणाने मृत्यू पावलेल्या महिलेवर झालेल्या आरोग्य यंत्रणेनेच अंत्यसंस्कार केले व यानंतर चक्क सात महिन्यांनी १८ डिसेंबर रोजी त्याच महिला कोविडचा पहिला डोस दिल्याचा संदेश सेंड केला असल्याने आरोग्य खात्यामधला सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे .

उंडणगाव ( ता . सिल्लोड ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्वताबाई अहेलाजी पाटील ( ७८ ) यांनी १८ डिसेंबर २०२१ च्या रोजी १ वाजेला लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद आहे . याप्रकरणी त्यांच्या मुलगा सूर्यभान पाटील यांच्या मोबाइलवर पार्वताबाई यांनी कोविशिल्ड लस घेतला असल्याचा संदेश आला . त्यानंतर त्यांचे लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र देखील आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेले आहे .

पार्वताबाई पाटील या २१ एप्रिलला आजारी पडल्याने त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply