कोरोना येणार या वर्षी आटोक्यात, हे कोरोनाचे शेवटचे वर्ष

शेअर करा.

जिनिव्हा : जगाला पूर्णपणे ग्रासून टाकणारी कोरोना साथ हि यंदाच्या वर्षात संपुष्टात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे , असा दिलासा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ . टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी सर्वांसमोर मांडलेला आहे विकसित देशांनी आपल्याकडील लसींचा गरीब देशांना पुरवठा करावा , हे देखील त्यांनी सांगितले .

कोरोना साथीचे हे यावर्षी तिसरे वर्ष आहे . घेब्रिसस म्हणाले की यंदाच्या वर्षी कोरोना साथ संपुष्टात येईल ,तरी त्यामध्ये विकसित देशांनी गरीब देशांना कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा न केल्यास काही अडथळे येऊ शकतात . जगात कोरोना लसींचे समप्रमाणात वाटप न झाल्यामुळेच ओमायक्रॉनसारखा नवा विषाणू हा निर्माण झाला . लसींच्या वाटपात असमानता आल्यास विषाणूंचे अधिकाधिक प्रकार निर्माण होण्याचा धोका आणखी वाढतो . बुरुंडी , कोंगो आदी गरीब देशांमध्ये एकूण लोकसंख्येपैकी फक्त एक टक्के लोकांनाच अद्याप लसींचा पुरवठा झालेला आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply