कोविडच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहिहंडी कशी होइल साजरी ? जाणून घ्या.

जळगाव : कोरोनाच्या संकटात यंदाही दहिहंडीला परवानगी नाकारण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी जळगावात दहिहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे . प्रमुख मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे . यंदाही प्रतिकात्मकरित्या हा सण साजरा होणार आहे . शहरातील तरुण कुढापा मंडळ सुभाष चौक मित्र मंडळ , युवा शक्ती फाऊंडेशन , एल . के . फाऊंडेशन यांच्याकडून २०१ ९ साली मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात आला होता . मात्र , गेल्या दोन वर्षात कोविडने सर्वत्र हाहाकार माजविला असून त्यामुळे गर्दीच्या कार्यक्रमांवर बंधने आली आहे . २०२० मध्येही हा उत्सव करण्यात आला होता . यावेळीही परवानगी नाकारण्यात आली आहे . त्यामुळे शहरात सर्व शासकीय नियम पाळून प्रतिकात्मक एक छोटी दही हंडी बांधून, गर्दी टाळून सण साजरा केला जाणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.