खराब रस्ता बनला नरकाचे द्वार ; घेतला महिलेचा बळी !

शेअर करा.

गेवराई तालुक्यातील चोरपुरी येथे खराब रस्त्यांमुळे एका महिलेचा बळी गेल्याची घटना घटली आहे त्यामुळे थेथील संपुर्ण परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
* आशाबाई गंडे यांना होत होत्या छातीत वेदना ,रुग्णालयात जातांना चाक फसले चिखलात :
छातीत वेदना होत असल्याने रुग्णालयात घेऊन जात असताना वाहनाचे चाक रस्त्याच्या चिखलात फसले . वाहन अडकल्याने उपचाराअभावी आशाबाई गंडे ( वय ४० ) यांनी गाडीतच प्राणसोडल्याची घटना सोमवारी घडली .
* गावात आहे रस्त्यांची अवस्था बिकट :
डोंगरदऱ्यात वसलेल्या चोरपुरी गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही . पावसाळ्यात तर अवस्था आणखीच बिकट होते . गावातील आशाबाई या अपंग महिलेला सोमवारी दुपारी छातीत वेदना सुरू झाल्या . त्यामुळे त्यांना घेऊन नेण्यासाठी चारचाकी गाडी रुग्णालयाकडे निघाली . मात्र वाटेतच चिखलात ही गाडी फसली . गाडी काही केल्या निघत नव्हती . तर आशाबाई यांना वाटेत रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कुठला पर्यायदेखील उपलब्ध नव्हता . दरम्यान , वेळेवर उपचार मिळू न शकल्याने आशाबाई यांचा गाडीतच मृत्यू झाला

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply