खर्देगावात दिवसपहारात घरफोडी , ४ लाखांची रोकड लांबविली !

शेअर करा.

शिरपूर : तालुक्यातील खर्दे येथील घर फोडून चोरट्यांनी तब्बल ४ लाख रुपयांची रोकड लांबविली . भरदुपारी चोरीची ही घटना घडल्यामुळे हळबळ उडाली . माहिती कळताच पोलीस घटनास्थळी तातकाल दाखल झाले . श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते . काही अंतरापर्यंत श्वानाने मार्ग दाखविला परंतु काही अंतरावर गेल्यावर श्वान माघे फिरले . शिरपूर तालुक्यातील खर्दे येथे आरिफ बोहरी यांचा किराणा आणि बांधकाम विक्रीचा व्यवसाय आहे . ते गावातील दत्त मंदिरासमोरील अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर
वास्तव्यास आहेत . मंगळवारी दुपारच्या पहारास बोहरी हे कुटुंबासह नमाज पठाण करण्यासाठी शिरपूर शहरातील मशिदीत गेले होते . ही संधी पाहून चोरट्यांनी त्यांच्या प्लॅटच्या
दाराचे कुलूप तोडले . घराच्या मुख्य दाराच्या कड्या तोडून घरातील कपाटातून चार लाख रुपयांची रोकड चोरुन नेली . आरीफ बोहरी दुपारी घरी आल्यावर चोरी झाल्याचा प्रकार समोर आला . घटनेची माहिती त्यांनी तात्काळ शिरपूर शहर पोलिसांना दिली . पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख पोलिसांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्या पाठोपाठ श्वान पथकही दाखल झाले होते . श्वानाने माग काढण्याचा प्रयत्नही केला . थोड्या अंतरानंतर ते ही माघारी फिरले .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply