खाणीत काम करणाऱ्या मजुराला सापडला ६० लाख रुपयांचा हिरा.

Khandeshtimes News मंडला ( मध्य प्रदेश ) : आदिवासी मजूर मुलायम सिंह यांची रोजची धडपड ही मुलांसाठीच्या खर्चाची तोंड मिळवणी करायची हीच , परंतु एका रात्रीत त्यांचे कठीण दिवस फिरले . त्यांना १३ कॅरट ६० लाखांचा हिरा जगप्रसिद्ध पन्ना हिन्यांच्या खाणीत सापडला . या खाणी बुंदेलखंड प्रांतात आहेत , असे अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले . इतर मजुरांनाही याच खाणींत वेगवेगळ्या वजनाचे ६ हिरे सापडले .

मुलायम सिंह यांना सापडलेल्या हिऱ्याचे वजन १३.५४ कॅरट असून , त्याची किमत किमान ६० लाख रुपये आहे , असे हिरे निरीक्षक अनुपम सिंहम्हणाले . हा हिरा मुलायम सिंह यांना कृष्ण कल्याणपूर भागात खाणीत खोलवर सापडला . इतर ६ पैकी २ हिरे हे ६ व ४ कॅरटचे असून , राहिलेले हिरे ४३,३७ आणि ७४ सेंटसचे आहेत , असे अनुपम सिंह म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published.