खाद्य तेलाचे दर हे प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने गृहिणींच्या किचनच्या बजेटमध्ये बिघाड आला आहे परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होऊ नये याकरिता केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला असून सरकारने पाम तेल , सोयाबीन व सूर्यफूल तेलाच्या कच्चा मालाच्या किंमतींमध्ये २०२२ वर्षा पर्यंत कपात केली आहे .
त्याच बरोबर कृषी उपकरांमध्ये देखील कपात करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे . यामुळे सणासुदीच्या काळामध्ये खाद्य तेलाच्या किंमती या कमी होणार आहे . त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे .
केंद्र सरकारने खाद्य तेलावरती सीमाशुल्क कमी केले आहे , कच्च्या पाम तेलावरील मूलभूत असा आयात शुल्क १० टक्क्यांवरून २.५ टक्क्यांवर करण्यात आलेला आहे , तर कच्च्या सोयाबीन तेलावर व कच्च्या सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क ७.५ टक्क्यांवरून २.५ टक्के करण्यात आलेला आहे .