खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांचा इशारा : स्थानिकांना नोकरी न दिल्यास आंदोलन करू.

भुसावळ : कोरोनाच्या काळामध्ये अनेक स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांच्या हातातून काम गेल्यामुळे त्यांच्या समोर रोजगाराचा प्रश्न उभा राहत आहे . अशा स्थानिक बेरोजगारांना दीपनगर प्रकल्पात रोजगाराची संधी द्यावी व स्थानिकांना काम नसेल तर प्रकल्प सुरू करू नका अशी ठाम भूमिका घेत वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी दिला . प्रकल्पासाठी अनेक भूमिपुत्रांनी आपल्या शेतजमिनी उपलब्ध करून दिल्या होत्या व त्या मोबदल्यात त्यांच्या कुटुंबियातील एका सदस्याला नोकरी देणे बंधनकारक असताना व करारात तसे नमूद असताना त्यांना डावलून प्रकल्पात हजार पेक्षा जास्त परप्रांतातील मजुरांना रोजगार मिळाला आहे . याविषयी गेल्या दोन वर्षापासून संबंधिता सोबत लढा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.