खिशाला चटका : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झाली वाढ.

शेअर करा.

अलीकडे पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे सामान्य माणूस हैराण झाला होता आता त्यापाठोपाठ घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच चटका बसणार आहे . सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती एलपीजी सिलिडरच्या किमती वाढवल्यात . गेल्या १५ दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महाग झालेत .

देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ( IOC ) ने विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केलीय , त्याचबरोबर १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ७५ रुपयांनी वाढ झालीय आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 884.5 रुपये झाला . तर आधी ८५९ .५० रुपये मिळत होता . यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती . दिल्लीत एलपीजीची किंमत ८३५.५० रुपयांवरून ८५ ९.५० रुपये करण्यात आली . १५ दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महाग झालेत . जुलै आणि ऑगस्टमध्ये दर वाढले होते . मे आणि जूनमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता . एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात १० रुपयांची कपात केली होती . दिल्लीत यावर्षी जानेवारीत एलपीजी सिलेंडरचा दर ६९४ रुपये होता , जो फेब्रुवारीत वाढवून ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आला . १५ फेब्रुवारीला दर वाढवून ७६९ रुपये करण्यात आले . यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरचा दर ७९४ रुपये करण्यात आला . मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची प्राईस ८१ ९ रुपये केली गेली . अशा प्रकारे गॅस सिलेंडर चे भाव हे कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply