जळगाव : कामावरून घरी पायी जाताना मोबाइलवर बोलत असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हरिहंत प्रमोदचंद कांकरिया या तरुणाच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल लांबविल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता गंधर्व कॉलनीत घडली . याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हरिहंत कांकरिया हा तरुण कोठारी एजन्सीज येथे कामाला आहे .
सोमवारी रात्री ८ वाजता कामावरून सुटी झाल्याने पायी गंधर्व कॉलनी येथे असताना मोबाइलवर बोलत होता .घराजवळ आल्यानंतर दुचाकीवरून दोन जण आले . त्यांनी कानाचा मोबाइल हिसकावून पळ काढला . हरिहंत याने पाठलाग केला , मात्र उपयोग झाला नाही . तपास हवालदार तुषार जावरे करीत आहेत . मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांचीही चिंता वाढली आहे . त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहणे आता आवश्यक झाले आहे.