• Tue. Aug 16th, 2022

  गळफास घेऊन वेटरची आत्महत्या

  ByKhandeshTimes

  Aug 17, 2021

   

  जळगाव : पाण्याच्या नळीने गळफास घेऊन जितेंद्र रमेश पाटील ( २५ , रा.चाळीसगाव ) या तरुणाने अजिंठा चौकातील हॉटेल महाराजामध्ये आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली . आत्महत्येचे कारण समोर आले नाही . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हॉटेल मालक किशोर महाजन व कामगार सकाळी १० वाजता हॉटेल उघडायला गेले असता तेथे पाणी भरण्याच्या नळीने जितेंद्र याने गळफास घेतल्याचे दिसले . त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले . जितेंद्र हा एक वर्षापासून हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता . पोलिसांनी आधारकार्डावरुन त्याची ओळख पटविली . त्याला दारुचे व्यसन असल्याचे सांगण्यात आले . या हॉटेलमध्ये तो एकटाच मुक्कामाला रहात होता . दुपारी कुटुंबिय आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले . तपास रतिलाल पवार करीत आहेत

  Leave a Reply

  Your email address will not be published.