गांजा च्या शेतामध्ये टाकला छापा, तब्बल १ लाख १ ९ हजार ३२० रुपये इतक्या किमतीची माल जप्त.

शेअर करा.

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी शिवारात गांजाची अवैधरित्या लागवड करून पीक घेतल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईतून समोर आल्याचे कळत आहे . १ लाख १ ९ हजार इतक्या किमतीची ६० किलो चे वजन असणारी गांजाची रोपे जप्त करण्यात आल्याचे समोर आले असून एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे . सोमवारी सायंकाळच्या पहारास पावणे सहा वाजेला शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी या गावात स्थायिक छोटू बन्सीलाल मिस्तरी याच्या शेतामध्ये पोलिसांनी छापा टाकला . त्याने स्वतःच्या शेतामध्ये आर्थिक फायद्यासाठी मानवी मेंदूवर परिणामकारक अशा गांजा सदृश अमली पदार्थाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केली होती . त्याची चोरटी विक्री करण्याच्या बेताने वाढवताना मिळून आला .

 

शेतातून १ लाख १ ९ हजार ३२० रुपये इतक्या किमतीची ५ ९ किलो ६६० ग्रॅम वजनाची गांजा वनस्पतीची हिरवी झाडे , पाने व फांद्यांसह मुळापासून उखड्डून जप्त करण्यात आल्याचे कळाले आहे. याप्रकरणी छोटू मिस्तरी यांच्याविरोधात एनडीपीएस अॅक्ट १ ९ ८५ चे कलम २० व २२ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेलाआहे . “

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply