गावठी कट्टा च्या जोरावर माजवित होता दहशत आता झाला जेरबंद.

जळगाव / वरणगाव : गावठी पिस्तूल सोबत ठेवून लोकांमध्ये दहशत माजविणाऱ्या यश म्हणून ओळखला जाणारा सोनू युवराज ( वय १ ९ तायडे रा . वरणगाव ता . भुसावळ ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी वरणगावातून अटक केली . यश हा गेल्या काही दिवसापासून वरणगाव येथील प्रतिभा चौकासह परिसरात गावठी पिस्तूल सोबत राखून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करीत होता . ही माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी त्याचा शोध घेण्यासाठीच्या सूचना दिल्या होत्या . यश हा वरणगावला पिस्तुलासह आढळल्याची माहिती प्राप्त होताच सहायक फौजदार अशोक महाजन , हवालदार दीपक पाटील , लक्ष्मण पाटील , किशोर राठोड , रणजीत जाधव , विनोद पाटील , ईश्वर पाटील व राजेंद्र पवार यांच्या पथकाने त्याला गुरुवारी सापळा लावून जाळ्यात घेतले . त्याला वरणगाव येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आर्म अॅक्टचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.