‘गुडबाय’ टाकले व्हाट्सअप स्टेटसला , आणि मिळाली आत्महत्येची खबर, काय घडला प्रकार.

औरंगाबाद : भर रात्रीच्या तीन वाजेला व्हॉट्सअप – स्टेटसला ‘ गुडबाय ’ असा मेसेज टाकून उच्चशिक्षित असलेल्या तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक अशी घटना बुधवारच्या पहाटे औरंगाबाद शहरामध्ये घडली, हा तरुण शहरांमध्ये फायनान्स कंपनीत नोकरीला होता त्याच्या आत्महत्येचे कारण अजून देखील समजले नाही .

 

याप्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार २५ वर्षीय नागे मधुकर तुरुकमाने या तरुणाने रात्रीच्या तीन वाजेच्या सुमारास व्हाट्सअप स्टेटसला गुडबाय असा मेसेज टाकला , याच दरम्यान याच प्रकारातील संदेश त्याने त्याच्या मावस भावाला देखील व्हाट्सअप वर सेंड केला आणी त्यानंतर त्याने गळफास घेऊन त्याची जीवन कथा संपवली , नागेश ने एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले पूर्ण केले होते , तो मूळचा हिंगोली जिल्ह्यामधील रहिवासी असून लहानपणापासून तो औरंगाबाद येथील भावसिंगपुरा येथील पेठेनगर भागामध्ये स्थायित होता .

Leave a Reply

Your email address will not be published.