चक्क कारागृहात केला तिने आत्महत्येचा प्रयत्न ! मग काय झाले.

शेअर करा.

जळगाव : शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन बंदी असलेल्या महिलेने सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बैरक क्रमांक २ मध्ये साडीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला .
अनिता राजा चावरे असे ‘ त्या ‘ न्यायालयीन बंदी महिलेचे नाव आहे . कारागृहातील कर्मचारी उषा भोंबे यांनी सोमवारी सकाळी कारागृहातील न्यायालयीन बंदींची मोजदाद करून अधीक्षकांना अहवाल दिला . त्यानंतर न्यायालयीन बंदी महिलांना बरेकच्या बाहेर महिला विभागामध्ये आणले .त्यांचा चहा , नाष्टा संपल्यानंतर ते ९ .१५ वाजेदरम्यान कारागृह अधीक्षक हे पाहणी करण्यासाठी दररोज येतात . त्यामुळे त्यांनी बंदी महिलांना रांगेत बसवलेले होते .

* साफसफाई कर्मचारी यांनी पाहिले तिला गळफास घेताना :
अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले व अत्याचार प्रकरणात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली बंदी महिला अनिता चावरे ही बाथरूममध्ये जाते , असे भोंबे यांना सांगून बॅरेक क्रमांक २ मध्ये गेली . त्याचवेळी भोंबे बॅरेकच्या मागच्या बाजूची साफसफाई बघण्यासाठी गेल्या . त्यावेळी चावरे ही साडीने स्वत : ला गळफास लावून घेताना त्यांना दिसली . तिने पायाखाली इतर महिलांचे अंथरूण घेतलेले होते . भोंबे यांनी तिला उचलून धरले . त्याचप्रमाणे इतर महिला बंदींना आवाज दिला . त्या महिलांनी चावरे हिला पकडून ठेवून तिच्या गळ्यातील फास काढला .
* कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचे तिने सांगितले :
कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचे तिने कारागृह अधीक्षकांना सांगितले . या घटनेबाबत कारागृह अधीक्षकांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली . याप्रकरणी भोंबे यांच्या फिर्यादीवरून चावरे हिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply