चाळीसगांव तालुक्यातील धक्कादायक प्रकार : गणपूर येथे कोरड्या नाल्यात अंदाजे एका दिवसाचा नवजात अर्भक आला आढळून !

शेअर करा.

चाळीसगाव । तालुक्यातील गणपूर येथील चितेगांव शेत शिवाराततील कोरड्या नाल्यात अंदाजे एका दिवसाचा नवजात अर्भक आढळून आल्याने संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

* शेत शिवाराततील कोरड्या नाल्यात आढळून आले अभ्रक :

चाळीसगाव तालुक्यातील गणपूर येथील झटक्या देववस्ती जवळील चितेगांव शेत शिवाराततील कोरड्या नाल्यात अंदाजे एकाच वर्षाचा पुरुष जातीचा नवजात अर्भक आज रोजी सकाळी ९ : ३० वाजताच्या सुमारास मिळून दिसून आला होता .

* बालकाच्या पालकाबाबतची माहिती अद्याप माहित नाही

बिस्मिल्ला अब्दुल पिंजारी यांच्या मालकीच्या पडीक शेतात नवजात अर्भक हा आढळून आला आहे . या घटनेची माहिती मिळताच येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली . त्याचबरोबर सदर बालकाच्या पालकाबाबत त्यांनी परिसरात विचारपूस केली असता मिळून आले नाही . त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्ती नवजात बालकाला सोडून गेले असावे . हे स्पष्ट झाल्यानंतर लागलीच त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांशी संपर्क करून रूग्णवाहिका बोलावली .

* बाळाला औषधोपचारसाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले :

पंचणामे करण्यात आले असून त्या बाळाला औषधोपचारकामी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . पोलिस पाटील सोमनाथ कुमावत यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे . त्यामुळे पोलिस याचा पुढील तपास करीत आहेत .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply