चाळीसगाव शहरासह अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .झाले असे की कोदगाव धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने तितुर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे या पुरामुळे रोकडे , बाणगावसह अनेक गावांचा संपर्क तुटला गेला आहे . तसेच रात्री पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळलेली असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे . महामार्ग विभागातर्फे वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे सततच्या पावसामुळे व अवघड घाटामुळे कामात अडचण येत असून या मार्गाने आपले प्रवासाचे नियोजन असल्यास ते तात्पुरते स्थगित करावे , अशा सूचना देण्यात येत आहे .
हा पाऊस चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी , उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आलेला आहे , तसेच इतर छोट्या – मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे , हे पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे .त्यामुळे गिरणा नदीची पाण्याची पातळी वाढत आहे . त्यामुळे नदीच्या काठावरील गावांना याद्वारे थोक्याचा इशारा देण्यात येत आहे .