चुईंगम ने घेतला तरुणांचा बळी.

Khandesh Times News

भडगाव  : तालुक्यातील एका नववीच्या विद्यार्थ्याच्या श्वसननलिकेत च्युईगम अडकल्यामुळे त्याचा करुण अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली . उमेश गणेश पाटील ( १५ , पांढरद ता . भडगाव ) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे .

गुरुवारी शाळा सुटल्यानंतर त्याने चुईंगम घेतली आणि गावी जाण्यासाठी रिक्षात बसला . च्युइंगम त्याच्या श्वासनलिकेत अडकल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले . त्याला तात्काळ भडगाव येथे खाजगी दवाखान्यात आणण्यात आले . तेथील डॉक्टरांनी त्याला पाचोरा येथे घेऊन जाण्यास सांगितले . त्याला पाचोरा येथे नेत असतानाच वाटेतच त्याची प्राणज्योत मालविली . गुरुवारी त्याचा गणिताचा पेपर होता . त्याने परीक्षा दिली . दुपारी च्युइंगम चघळत असतानाच हा प्रकार घडल्याचे शाळेच्या सूत्रांनी सांगितले . उमेश याचे वडील गणेश पाटील हे शेतकरी आहेत . या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.https://khandeshtimes.in

Leave a Reply

Your email address will not be published.