‘चेअर ऑफ एक्सलन्स ‘साठी झाली निवड पुणे विद्यापीठाची.

शेअर करा.

पुणे : पूर्ण भारतातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘ चेअर ऑफ एक्सलेन्स ‘ साठी पात्र ठरले आहे, महत्त्वाचे कारण म्हणून विद्यापीठाकडे असलेली बौद्धिक संपदा आहे ,हे मत संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मयांक तिवारी यांनी शुक्रवारी कळवले . भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण व सामरिकशास्त्र विभागात ‘ चेअर ऑफ एक्सलेन्स ‘ यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर ३ सप्टेंबर २०२१ रोजी सह्या केल्या गेल्या . यावेळी २ कोटी रुपयांचा चेकही प्रातिनिधिक स्वरूपात संरक्षण मंत्रालयाकडून देऊ करण्यात आला . त्यावेळी मयांक तिवारी बोलत होते .

 

कार्यक्रमाला लष्करी प्रशिक्षण विभाग संचालक एस . गोपाल कृष्णा , लष्करी इतिहास विभागाचे डॉ.ए.के.मिश्रा , कुलगुरू डॉ . नितीन करमळकर , प्र कुलगुरू डॉ . एन.एस.उमराणी , कुलसचिव डॉ . प्रफुल्ल पवार , संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ . विजय खरे व संरक्षण क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते . मयांक तिवारी सांगतात , लष्कराविषयीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या हेतूने आम्ही हा करार केला आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply