चोरटे सुसाट : वृद्ध महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी लांबवले.

शेअर करा.

जळगाव : कचरा टाकण्यासाठी अपार्टमेंटमधून खाली उतरलेल्या ७२ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या दोन भामट्यांनी लांबवले . ही घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता चैतन्यनगरात घडली . प्रमिला बालकिसन सोमाणी ( वय ७२ , रा , चैतन्यनगर ) यांच्या सोबत ही घटना घडली आहे . सोमाणी ह्या कचरा टाकण्यासाठी अपार्टमेंटमधून खाली उतरल्या होत्या . रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्यानंतर त्या पुन्हा अपार्टमेंटकडे पायी जात असताना रस्त्याने दुचाकीवरुन आलेल्या दोन भामट्यांनी सोमाणी यांनी काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडले . सोमाणी यांनी आरडाओरड केली पण तोपर्यंत दोघे भामटे दुचाकीवरून पसार झाले होते . या प्रकरणी सोमाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन भामट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे . त्यामूळे पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहे. अशा शहरात होणाऱ्या वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये असुर्रक्षतेची भावना निर्माण झाली आहे . त्यामुळे पोलीसांनी यावर काही उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply