• Tue. Aug 16th, 2022

  जपानची सुप्रसिद्ध अभिनेत्री 22 व्या मजल्यावरुन पडली खाली.

  ByKhandeshTimes

  Dec 23, 2021

  जपानची प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका सायाका कांडा हिचा २२ व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . सायाका ही होक्काइडो बेटावरील एका हॉटेलमध्ये थांबली होती . त्याच हॉटेलच्या २२ व्या मजल्यावर असलेल्या खोली मधून पडल्यानंतर सायाकाचा अपघाची मृत्यू झाला .

  अभिनेत्रीच्या निधनामुळे तिच्या फॅन्समध्ये शोककळा पसरली आहे . सायाका कांडा ही ३५ वर्षांची असून १८ डिसेंबरच्या रात्री उंचावरून पडल्यानंतर सायाका या हॉटेलच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली होती . तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले परंतु , डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही अभिनेत्रीला वाचवता आलेले नाही .

  Leave a Reply

  Your email address will not be published.