जबरी लूट प्रकरणी पोलिसांनी दोघांना पकडले.

शेअर करा.

सोनगीरकडून धुळ्याकडे येत असताना नगाव शिवारात रात्रीच्या वेळेस धुळ्यातील साक्री रोडवरील एकाला तीक्ष्ण हत्याराने वार करुन खिशातून रोकडसह मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या दोघांना पश्चिम देवपूर पोलिसांनी दोघांना पकडले आहे . त्यांच्याकडून लुटीचे २ हजार आणि मोबाईल जप्त केला आहे . कुमारनगरातील सुनील अर्जुनदास तलरेजा हे सोनगीरकडून धुळयाला येत होते . २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते साडेअकरा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नगाव गावाजवळील दर्याजवळ दोन तरुणांनी त्यांना थांबविले . काहीतरी तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करुन त्यांना जखमी केले . धाक दाखवून त्यांच्या खिशातील ४ हजार रुपये रोख आणि ६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने काढून पोबारा केला होता . तपास सुरु असताना संशयावरुन मास्तर उर्फ किरण बालू सोनवणे आणि गोंदूर रोडवरील लक्ष्मी चौकात राहणारा सोन्या उर्फ सुनील वामन पारधी यांना २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली .आता पोलीस या घटनेची कारवाई करत आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply