• Tue. Aug 16th, 2022

  जमिनीच्या वादामुळे पिता पुत्राचा खून , धारदार शस्त्राने केला डोक्यात वार.

  ByKhandeshTimes

  Dec 11, 2021

  शिरसाळा ( बीड ) : जमिनीच्या खरेदी आणि विक्री व्यवहारातून दहा वर्षा आधी मुलाचा खून झाला होता . त्यामागोमाग पित्यालाही डोक्यात धारदार अस्या शस्त्राचा वार करून निर्घृणरीत्या संपविण्यात आल्याची घटना घडली आहे . सिरसाळा ( ता . परळी ) येथे बुधवारी रात्री ही चित्तथरारक घटना समोर आली . मारेकरी हा सध्या तरी फरार आहे . हरिभाऊ नामदेव ढेबरे ( ७५ , रा . सिरसाळा ) असे मृत्यू पावलेल्याचे नाव आहे . दहा वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा विलास याची हत्या झालेली होती . याप्रकरणाच्या आरोपावरून महादेव पोटे ( रा . सिमरी पारगाव , ता . माजलगाव ) या नात्यातील व्यक्तीवर गुन्ह्याची नोंद झाली होती .

  या प्रकरणा मध्ये २०१६ ला त्याची निर्दोष मुक्तता झाली होती . त्यावेळेपासून तो कारागृहाबाहेर आहे . बुधवारी सायंकाळीच्या रोजी विलासचे वडील हरिभाऊ ढेबरे हे शेतातून घराच्या दिशेने परतत होते . यावेळी शेतीच्या असलेल्या जुन्या वादातून महादेव पोटे याने त्यांच्याशी वाद घातला . जमीन ही माझ्या नावे करा , असे म्हणत महादेवने शास्त्राच्या साहाय्याने त्यांच्या डोक्यात वार केला . त्यात हरिभाऊ ढेबरे यांचा जागच्याजागी मृत्यू झाला . त्यानंतर महादेवने यांनी पोबारा केला . मयत हरिभाऊ यांचा मुलगा कैलास ढेबरे यांच्या फिर्यादीवरून शिरसाळ येथील ठाण्यात महादेव पोटेवर खुनाचा गुन्ह्याची नोंदणी करण्यात आली .

  Leave a Reply

  Your email address will not be published.