जळगावचा सुपुत्र होणार आता गुजरातचा मुख्यमंत्री ? जाणून घ्या सत्यता.

* गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाने यांनी दिला राजीनामा गुजरातचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे . कोरोना काळात त्यांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे त्यांना राजीनामा देण्याची वेळ आले असल्याचे जाणकार म्हणत आहेत .

* मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे खासदार चंद्रकांत पाटील

तसेच दुसरीकडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ज्यांचे नाव आघाडीच्या काही नेत्यांमध्ये घेतले जात आहे ते म्हणजे खासदार सी.आर.पाटील ( चंद्रकांत पाटील ) , चंद्रकांत पाटील हे मूळ जळगाव जिल्ह्यातील असून तेसध्या ते भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष आहेत . गुजरात आणि मराठी माणसाचा वाद हा जूना आहे . संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी मुंबई गुजरातकडे वळावी अशी तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची इच्छा होती . मात्र त्यावेळी ते साध्य होऊ शकले नाही . तेव्हापासूनच गुजरात आणि मराठी माणूस यांच्या मधल होईल हे सर्वश्रुत आहे .

* मूळ जळगावचे आहे चंद्रकांत पाटील सध्या गुजरातमध्ये स्थायिक

मूळ जळगावचे असलेले चंद्रकांत पाटील हे गुजरातमध्ये स्थायिक झाले आणि आता तिथलेच होऊन बसले आहेत . गुजरातच्या राजकारणात त्यांनी चांगलाच जम बसवला असून सध्या ते गुजरात राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत . ते जर गुजरातचे मुख्यमंत्री बनले तर या सगळ्या समीकरणांना केराची टोपली मिळणार आहे .

* जळगाव मधील मुक्ताईनगर तालुक्यातील पिम्प्री हे त्यांचे आहे जन्मस्थान

सी.आर.पाटील यांचा जन्म 1955 साली जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पिम्प्री अकाराउत या गावी झाला . त्यावेळी जळगाव मुंबई प्रांताचा भाग होता . 1960 साली भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र आणि गुजरात अशी राज्यं निर्माण झाली . पाटील यांचे कुटुंबीय गुजरातला रवाना झाले .सी.आर.पाटील यांनी आपलं प्राथमिक शिक्षण दक्षिण गुजरातमधून पूर्ण केलं . त्यानंतर त्यांनी सुरत इथल्या आयटीआय अर्थात इंडस्ट्रिभल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेतून सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला . 25 डिसेंबर 1989 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत सी.आर.पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला .

Leave a Reply

Your email address will not be published.