जळगावमध्ये आढळला दुर्मिळ प्रजातीचा भारतीय अंडीखाऊ सर्प.

शेअर करा.

जळगाव : सध्याच्या काळात दृष्टीस न पडणारा असा निमविषारी भारतीय अंडीखाऊ सर्प ( इंडियन एग इटर ) हा सर्प जळगाव शहरातील सत्यम पार्क येथील नागरी रहिवासात सुरक्षित रेस्क्यू करण्यात आला . त्याला मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांच्या निगराणीत सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आला .

घरात साप असल्याचा कॉल वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र गणेश सोनवणे यांना आला. आपल्या माहिती करिता गणेश सोनवणे हे पिंप्राळातील रहवासी असून त्यांनी आतापर्यंत अनेक प्रजातींच्या सापांना जीवदान देण्याचे मोलाचे कार्य केले आहे. आणि त्याही सापाला जीवदान देण्याच्या हेतूने त्यांनी सत्यम पार्क गाठले .

दरम्यान सर्प अंगणात असलेल्या कढीपत्याच्या झाडावर जाऊन बसला . शोध घेतला असता सर्प दिसून आला नेहमी पेक्षा वेगळा वाटल्याने गणेश सोनवणे यांनी त्याचे निरीक्षण केले असता तो भारतीय अंडीखाऊ सर्प असल्याचे जाणवले . त्या सर्पाला सुरक्षित रित्या रेस्क्यू करून संस्थेच्या रेकॉर्ड ला नोंदी साठी त्याचे छायाचित्र घेऊन वनविभागाच्या निगराणीत सुरक्षित ठिकाणी मुक्त करण्यात आले

वन्यजीव संरक्षण संस्थेने १० वर्षात २१ भारतीय अंडीखाऊ सर्प वाचवून सुरक्षित अधिवासात सोडले आहेत ही २२ वी नोंद ठरली . पूर्वी शहराचा विस्तार आजच्या इतका नसल्याने झाड – झुडपे , मोकळी मैदाने खूप होती , शेती शिवार मुबलक होते , बांधावरील लहान मोठ्या झाडांवर बुलबुल , मुनिया , सुगरण , नर्तक , चिमणी या सारखे पक्षी घरटी करून राहत असत . त्यांची अंडी खाऊन हा सर्प आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे . परंतु या झाडांची कत्तल , कपाशी , तूर , भेंडी , सारख्या पिकांवरील कीड , अळ्या खाण्यासाठी सोयीचे ठरते म्हणून शिंपी पक्षी , सुर्यपक्षी शेतातच घरटी करत.आता शेतात रासायनिक फवारणी होत असल्याने या पक्षांनी शेतांकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे . त्याच बरोबर शेताचे बांध पेटवले जात असल्याने भारतीय अंडीखाऊ सर्पाच्या अधिवसाला धोका पोहचत आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply