जळगावात आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार १४४ कलम लागू.

जळगाव , ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी , याकरीता आज सोमवार , दि . 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ( 1 ) ( 2 ) ( 3 ) लागू करण्यात आले आहेत . या काळात जिल्ह्यात धरणे , मोर्चे , आंदोलन यावर बंदी घालण्यात आली आहे .

 

” जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढलेल्या आदेशाता म्हटलं आहे की , पोलीस अधीक्षक जळगाव यांनी २१ रोजी पत्रान्वय कळविल्या नुसार विविध राजकीय पक्ष / संघटना यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक २२ नोव्हेंबर रोजी अमरावती येथे दिनांक १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीची चौकशी तसेच रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी व इतर मागण्यानकरीता धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे . सदर धरणे आंदोलन दरम्यान विविध राजकीय पक्ष / संघटना यांचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांचेकडून अंदोलणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शासन , प्रशासनास अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . जिल्हा घटकात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी .

 

कोणत्याही छोट्याशा घटनेवरून दोन समाजामध्ये जातीय दंगली होऊ नयेत व शांतता अबाधित राहावी करिता दिनांक २२/११/२०२१ रोजी सकाळी 6.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ( 1 ) ( 2 ) ( 3 ) लागू करण्यात आले आहेत .

 

विविध राजकीय पक्ष संघटना यांच्यातर्फे दिनांक २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनामुळे जळगाव जिल्ह्यात दोन समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था भंग होऊन समाजात द्वेष निर्माण होऊन दंगली सारखे गंभीर गुन्हे घडून सार्वजनिक मालमत्तेस धोका उत्पन्न होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी माझ्या निदर्शनात आणून दिले आहे आणि ज्याअर्थी अशा वातावरणात जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था भंग होऊन दोन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगल होऊ नये व शांतता अबाधित राहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वय जळगाव जिल्हा हद्दीमध्ये मोर्चा धरणे आंदोलन यावर बंदी घालणे जरुरीचे आहे अशी माझी खात्री झाली आहे .
त्याअर्थी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वय मी अभिजित राऊत जिल्हादांडाधिकारी , जळगाव मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दिनांक २२/११/२१ रोजी सकाळी ६ ते रात्री २४ वाजेपर्यंत जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ( 1 ) ( 2 ) ( 3 ) लागू करण्यात आले आहे . .

 

Leave a Reply

Your email address will not be published.