जळगावात पुन्हा झाली निर्घृण हत्या , सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हत्येमुळे नागरीक भयभीत.

जळगाव । शहरात काल सकाळी भर रस्त्यावर मुलांनी बापाचा खून केल्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा सोमवारी पहाटे खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे . जुना जळगाव परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन समोर राहणारे राजू पंडित सोनवणे ( वय ५५ ) यांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे .

* जवळपास १५ वर्षांपासून होता लक्ष्मी नगरात सहवास :

त्यांची पत्नीचे नाव रजिया सोनवणे असून जवळपास १५ वर्षांपासून दोन्ही पती – पत्नी आणि दोन मुले असे लक्ष्मी नगरात स्थायिक झाले होते .

 * व्यवसायाने राजू सोनवणे होते रिक्षाचालक :

राजू सोनवणे हे रिक्षा चालक होते परंतु गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते . आंबेडकर वाड्यासमोर राजू सोनवणे यांची आई व पुतण्या राहत असल्याने ते त्यांना भेटायला येत होते .

* ते रात्री आईला भेटायला आले आणि रात्री तिथेच थांबले:

रविवारी रात्री देखील ते आईला भेटायला आले आणि रात्री तिथेच थांबले . रात्री राजू यांची आई दुपदाबाई आणि पुतण्या विशाल अनिल सोनवणे असे घरी होते . राजू सोनवणे रात्री घराच्या वरील मजल्यावर झोपायला गेले तर आई व पुतण्या खालील खोलीत झोपले होते . सोमवारी सकाळी ८.३० वाजले तरी राजू सोनवणे खाली न आल्याने त्यांनी एक मुलाला वर पाठविले असता त्याला घडलेला प्रकार लक्षात आला .

राजू सोनवणे यांचे डोकं ठेचून हत्या करण्यात आली असून घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले आहेत.या प्रकरणामुळे संपुर्ण परिसरात भितीदायक वातावरण पसरले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.