• Tue. Aug 16th, 2022

    जळगावात लावले corona साठी निर्बंध मास्क न दिसल्यास ५०० रुपयांचा दंड

    जळगाव : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये लसीकरणाविणा रेल्वेसोबत इतर सेवेचे प्रवास तिकीट तर मिळणार नाहीत , खरेदीवरदेखील मोठ्या प्रमाणावर बंधने येणार आहेत . लसीकरणाशिवाय ग्राहकांना माल देऊ नये , याकरिता व्यावसायिकांना सूचना दिल्या गेल्या असून तशी मोहीम राबविण्याचे ठरविले गेले आहे . महात्मा फुले मार्केट येथे विनामास्क कोणी परिसरामध्ये आढळल्यावर जागेवरच ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे . सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आरोग्य सुविधा मुबलक ठेवण्याचे निर्देश जाहीर केले आहेत .यांचे लसीकरण अजून बाकी असल्यास , त्यांना रेल्वे , एसटी बस , खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट देऊ नये , या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या . महात्मा फुले मार्केट परिसरात विनामास्क कोणी आढळल्यास जागेवरच ५०० रुपयांचा संबंधित व्यक्तीकडून आकारण्यात येईल , अशा सूचना मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी यंत्रणेला दिल्याचे कळाले आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published.