जळगावात सकाळी दोन मजली इमारत अचानक कोसळली, मोठ्या प्रमाणात झाले नुकसान.

शेअर करा.

जळगाव : शहरातील शनिपेठ भागामधील १७ नंबर शाळेच्या समोरच्या दोन मजली इमारत हि अचानकपणे कोसळली . ही घटना आज पहाटेच्या ५ वाजेच्या सुमारास घडली असून यामध्ये सुदैवाने तात्काळ बाहेर पडल्याने ७ लोकांचा प्राण वाचला आहे . या घटनेमुळे मोठी वित्तहानी झाल्याचे कळाले आहे .

 

शहरांमधील शनीपेठ परिसरामध्ये असणाऱ्या मनपा गंगुबाई शाळेसमोर असलेली दोन मजली इमारत अचानक पणे कोसळली . ही इमारती अद्याप कोणत्या कारणाने कोसळली हे अजून देखील समोर आले नाही . यात बारा जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे . तर यातील सात जण जखमी अवस्थेत आहेत . यात एका वृध्द महिलेस तीव्र अशी दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे . सामाजिक कार्यकर्ते कृणाल महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले .

 

या ठिकाणी घडलेल्या घटनेबद्दल नागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे याच इमारतीच्या अलीकडेच एका नव्या इमारतीची बांधकाम सुरू करण्यात आलेले असून याकरिता परवानगी घेण्यात आलेली नाही . या परवानगी नसलेल्या इमारतीच्या कामकाजामुळे ही दोन मजली इमारत कोसळली असल्याचा आरोप करण्यात येत आहे . याबाबतीतील शेवटचे वृत्त हाती आले . तोपर्यंत पोलीसात नोंद झाली नव्हती . या प्रकरणाबाबतची चौकशी करण्यात यावी ही मागणी परिसरातील लोकांनी केलेली आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply