जळगावात सलून व्यावसायिकाचा झाला खून कारण अद्याप स्पष्ट नाही.

जळगाव : शहरातील चौघुले प्लॉट परिसरामध्ये रविवारचा रात्री १० वाजेच्या सुमारास सुनील सुरेश टेमकर ( ३४ , रा . प्रजापतनगर ) या सलून व्यावसायिक असलेल्या तरुणाची चाँपरच्या सहाय्याने वार करून निर्घृण हत्या केली गेली आहे. रात्री उशिरा शनिपेठच्या पोलिसांनी दोन जणांना चौकशी करण्याकरिता ताब्यात घेतल्याचे कळाले आहे . प्रजापत नगरात स्थाईक असलेल्या सुनीलचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान आहे .

रात्री १० वाजेच्या सुमारास सुनीलवर एका तरुणाने चॉपरने वार केला . यात सुनील हा अत्यंत गंभीर रित्या जखमी झाला . दहा ते पंधरा मिनिट तो जागेवरच पडलेला होता . जास्तीचा रक्तस्त्राव झाल्याकारणाने त्याची प्राणज्योत मालावली . अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे हे घटना स्थळी पथकासह पोहचले . हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . मयताच्या पश्चात आई , पत्नी योगिता , मुलगा रोनक , मुलगी दीप्ती , भाऊ असा परिवार आहे . घटनास्थळी पोहोचला होता .

Leave a Reply

Your email address will not be published.