जळगावात 17 वर्षीय मुलाने केली मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून आत्महत्या

खान्देश टाईम्स न्यूज : जळगाव शहरांमधील पिंप्राळा भागात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची घटना आज सायंकाळी समोर आली आहे . त्याने स्मार्टफोनचा कॅमेरा सुरू करून स्वतःच्या आत्महत्येचे चित्रीकरण करून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आलेले आहे . घनश्याम संजय भोई ( वय १७ रा . पिंप्राळा हुडको जळगाव ) या तरुणाने आज सायंकाळी आत्महत्या करून आपली जीवन कथेला संपूर्ण विराम दिला आहे . घनश्याम भोई हा आई मंदाबाई , वडील मोठी बहिण गीता भोई यांच्यासह सेट्रल बँक कॉलनी , पिंप्राळा परिसर जळगाव येथे वास्तव्याला आहे . आईवडील आणि मोठी बहिण हे देवाच्या कार्यक्रमाकरिता असल्यामुळे मुळगावी नेरी पिंप्री जामनेर येथे गेलेले असताना तो घरात एकटाच होता .

२४ डिसेंबर शुक्रवारी रोजी त्याने राहत्या घरात गाणे वाजवून गळफास घेवून आत्महत्या केली . शेजारी राहत असणाऱ्या महिलेला हा प्रकार लक्षात आल्याने घटना सर्वांसमोर समोर आली आहे .यादरम्यान , शेजारच्यांनी रामानंद नगर पोलीसांना घटनेची माहिती दिली असून मृतदेह हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जाण्यात आले आहे . दरम्यान अल्पवयीन मुलाने गळफास का घेतली यांची कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

दरम्यान , गळफास घेण्याच्या आधी घनश्याम याने समोर स्टँडला स्मार्टफोन लाऊन यातील कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केले होते . यामुळे यात त्याच्या आत्महत्येची घटना रेकॉर्ड झाल्याचे पोलिसांना तपासणीमध्ये आढळून आले आहे . त्याने आत्मघाताचे पाऊल नेमके कोणत्या कारणाने घेतले असावे ? आत्मघात करत असतांना त्याने याचे रेकॉर्डींग का म्हणून केली असेल ? याची माहिती मात्र पोलिसांना अद्याप मिळालेली नाही .

Leave a Reply

Your email address will not be published.