जळगाव जिल्ह्यातून नवीन विंचवाच्या प्रजातीचा शोध, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले आणि अक्षय खांडेकर यांचे संशोधन.

शेअर करा.

ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले आणि अक्षय खांडेकर यांचे संशोधन.

सातपुडा पर्वतावरुन नामकरण.
नवीन प्रजातीं ही बुथीडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहे. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील वाघझीरा व खिरोदा या गावात ही प्रजाती आढळून आली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ही आढळली म्हणून तिचे नामकरण कॉमसोबुथस सातपुराएनसीस (Compsobuthus satpuraensis) असे करण्यात आले आहे. जगभरात कॉमसोबुथस या जातीच्या 50 प्रजाती आढळून येतात. भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहीली प्रजाती आहे.

 

रंग, शेपटीरावरील वैशिष्ट्यपूर्ण दानेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर, शरीरावरील उठाव यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते. नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून ती माळराने, झुडपी जंगले, व पानगळीच्या जंगलांमध्ये दगडांच्या आडोश्याने आढळून येते. 2020 च्या ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा ही प्रजाती आढळून आली होती. साधारण वर्षभर त्यावर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे लक्षात आले, त्यासंबंधीच्या संशोधनाची तज्ञानी पुष्टी केल्यानंतर हा शोधनिबंध अमेरिकेतुन प्रकाशित होणाऱ्या युस्कोर्पिअस या संशोधन पत्रिकेतून काल प्रकाशित करण्यात आला.

 

या संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे (जळगाव), सत्पाल गंगलमाले (सोलापुर), अक्षय खांडेकर (सांगली) या संशोधकांचा समावेश आहे. या शोधामुळे भारतात अजूनही विंचु आणि एकूणच पर्यावरणीय संशोधनाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही, हे अधोरेखित होते.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply