• Tue. Aug 16th, 2022

  जळगाव जिल्ह्यात पीकविमा न देणाऱ्या बँकांवर आता होणार कारवाई.

  जळगाव जिल्ह्यात सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्यावरही त्यांना नुकसानीचा विमा मिळालेला नव्हता . यामुळे जिल्ह्यातील सुमारे ११ राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांवर गुन्हे नोंदविण्याच्या सूचना पोलिसांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत .
  जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत पीकविमा न मिळाल्याबाबत खासदार रक्षा खडसे यांच्यासह अनेक आमदार , समितीच्या सदस्यांनी तक्रार केली होती . तसेच यात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी केली होती . जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांनी भरूनही पिकांच्या नुकसानीचा विमा न मिळाल्याने ११ बँकांवर गुन्हे दाखल करून जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू केली आहे . यात आयसीआयसीआय बँकेकडे एक कोटी ३५ लाखांची विमा अडकला आहे . सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया , सेंट्रल बँकेसह इतर विविध बँकांच्या शाखांचा समावेश आहे .
  शासन निर्णय असा आहे पीकविमा भरल्यानंतर नुकसान झाल्यावर विम्याची रक्कम मिळाली नसल्याची चूक ज्यांची आहे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून विम्याची रक्कम घ्यावयाची आहे . जिल्ह्यातील सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी वरील बँकांमध्ये पीकविम्याची रक्कम भरली . असे असताना बँकांनी शेतकऱ्यांचे आधारकार्ड घेतले . जेव्हा माहिती भरली , तेव्हा आधारकार्डावरील नावात , खाते क्रमांकात चुका केल्या आहेत . यामुळे पीकविमा कंपन्या विम्याची रक्कम देण्यास नाकारत आहेत . यामुळे कृषी विभागाने शासनाच्या निर्णयानुसार बँकांवर जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली . सोबत ज्या शाखांत पैसे भरले , त्या शाखांविरोधात गुन्हे नोंदविण्यात येत आहेत .या कारवाई मुळे बऱ्याच शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.