दवाखान्यात जाण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पोटच्याच मुलाने आपल्या बापाला मारल्याची धक्कादायक घटना आज जळगावात घटली आहे. प्रेमसिंग अभिसिंह राठोड (वय ५०वर्ष ) नेमखेडी शिवार कांताई परिसरात हे वास्तववास होते .
आपली पत्नी दोन मुले आणि मुले यांच्यासह ते वास्तवास होते
प्रेमसिंह हे आजारी असल्यामुळे आज सकाळी त्यांची मुले दीपक आणि गोपाळ यांनी त्यांना दवाखान्यात जाण्यास सांगीतले . परंतु त्यांनी वाद घातला आणि याच कारणावरून प्रेम सिंग यांनी चाकू हातात घेत मुलांना धमकावले या झटापटीत दोनी मुलांनी आपल्या वडिलांवर वार करीत संपवले आहे.
काही वेळेत झालेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच तालुका पोलीस स्टेशनने पुढील कारवाई करीत सध्या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .