जळगाव मधील भंगार बाजार घेणार मोकळा श्वास

शेअर करा.

जळगाव : शहरातील अजिंठा चौक च्या परिसरामध्ये भंगार बाजाराची मुदत ही तीन वर्षा आधीच संपलेली असल्याने मनपा प्रशासनाने आता भंगार बाजारची जागा ताब्यात घेण्याकरिता तयारी केली आहे . मनपा प्रशासनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या महासभेच्या निकालानुसार ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिलेले आहेत .

सर्व दुकानदारांची सुनावणी पूर्ण

मनपाने या ठिकाणी व्यवसाय करीत असलेल्या ११७ जणांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे . सर्व दुकानदारांसाठी ८१ ब च्या नोटिसा या आठवड्यात दिल्या जाणार असून , दुकानदारांना आपले संपूर्ण साहित्य घेऊन जाण्यास ठरावीक मुदत देण्यात येणार आहे . परंतु , मुदतीत जागा खाली न झाल्यास मनपाकडून ही जागा ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती मनपामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply